सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
  • नेपाळच्या महापुरात पुण्याचे ४ पर्यटक अडकले; ट्रॅव्हल कंपनीने साथ सोडल्याचा तरुणीचा आरोप, सरकारकडे मदतीची आर्त हाक
 शहर

पुणे विभाग शिक्षक पदवीधर मतदार संघ निवडणूक ‌२०२६ टीडीएफ पुरस्कृत उमेदवाराची घोषणा;टीडीएफ कडून कौस्तुभ गावडे लढणार निवडणूक !

डिजिटल पुणे    28-08-2026 15:21:47

 पुणे : टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट (टीडीएफ) म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी च्यावतीने पुणे विभाग शिक्षक-पदवीधर मतदारसंघ - २०२६ साठी पुरस्कृत  उमेदवाराची आज घोषणा केली आहे.  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे  मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या  नावाची घोषणा आज  पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य टीडीएफ च्या वतीने करण्यात आली.यावेळी शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी. के. थोरात (पुणे), कार्याध्यक्ष नरसु पाटील (कोकण), कार्यवाह के. एस. ढोमसे (पुणे), पुणे विभाग अध्यक्ष शिवाजीराव कामथे, पुणे विभागाचे प्रवक्ते प्रा. शशिकांत शिंदे,पुणे विभागाचे प्रसिद्ध प्रमुख प्रा.संतोष थोरात तसेच निवड समितीतील इतर राज्य कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

कौस्तुभ गावडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना शिक्षकांची जुनी पेन्शन योजना, पदवीधरांच्या  रोजगाराचे प्रश्न, विनाअनुदानित शाळा तसेच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, संच मान्यता, पवित्र पोर्टल याबाबतचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडणार असल्याचे सांगितले. सर्व शिक्षक आणि पदवीधर संघटनांनी एकजूट होऊन टीडीएफ ला पाठिंबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ही १९६५ मध्ये स्व.आमदार तात्यासाहेब सुळे यांनी स्थापन केलेली राज्यातील जुनी शिक्षक संघटना आहे.आतापर्यंत टीडीएफच्या माध्यमातून २० ते २२ आमदारांनी महाराष्ट्र विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व केले आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेने आंदोलने आणि संपाच्या माध्यमातून सातत्याने लढा दिला आहे.

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील उमेदवारी बाबत रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये ४ इच्छुक उमेदवार कौस्तुभ गावडे (कोल्हापूर), निळकंठ लिंगे (सोलापूर),  सचिन सानप (पुणे) व  एन. एस. पाटील (सांगली) यांनी मुलाखती दिल्या होत्या.राज्य कार्यकारिणीने व निवड  मंडळांने  घेतलेल्या निर्णयानुसार   संघटनेशी असलेली बांधीलकी, शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव, मतदार संघात असलेला संपर्क तसेच निवडून येण्याची क्षमता या सर्व गोष्टींचा विचार करून निवड समितीच्या निर्णयानुसार   पुरस्कृत उमेदवार म्हणून   कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

उमेदवार परिचय

 कौस्तुभ मुरलीधर गावडे हे  सध्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत मुख्य कार्यकारी  अधिकारी पदावर कार्यरत आहेत.संस्थेतील तसेच शिक्षकांचे सक्षम युवा नेतृत्व म्हणून परिचित आहेत.शिक्षक व शिक्षकेतर प्रश्न तसेच शैक्षणिक प्रश्नांची उत्तम जाण आहे.वेळोवेळी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर प्रश्नांसाठी निवेदने आंदोलने व मेळाव्याचे आयोजन अनेक शैक्षणिक समस्यांचा आयुक्त तसेच संचालक कार्यालयामध्ये पाठपुरावा करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात आग्रही राहिले आहेत.पुणे विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये दांडगा संपर्क आहे.

--


 Give Feedback



 जाहिराती