सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
  • नेपाळच्या महापुरात पुण्याचे ४ पर्यटक अडकले; ट्रॅव्हल कंपनीने साथ सोडल्याचा तरुणीचा आरोप, सरकारकडे मदतीची आर्त हाक
 जिल्हा

लोकप्रतिनिधी, महापौर, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या दीर्घकालीन एकत्रित अपयशाचा परिणाम म्हणजे पुणेकर नागरिकांचे कर्णकर्कश्य डीजे विरोधात रस्त्यावरचे उतरणे.*

MSK    30-08-2026 16:24:47

*लोकप्रतिनिधी, महापौर, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या दीर्घकालीन एकत्रित अपयशाचा परिणाम म्हणजे पुणेकर नागरिकांचे कर्णकर्कश्य डीजे विरोधात रस्त्यावरचे उतरणे.*

*ध्वनी तीव्रतेचा त्रास पुणेकरांना होऊ न देणे ही प्रथम नागरिक महापौर यांची जबाबदारी. आपल्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालणं नव्हे!*

पुण्यामध्ये ध्वनी प्रदूषण म्हणजेच गणेश उत्सवातील डॉल्बी आणि डीजे च्या आवाजा विरोधात नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या असून याबाबत आज रविवारी आंदोलनही करण्यात आले. आता याबाबत आम आदमी पार्टीने ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

' गेले काही वर्षे, सर्व प्रकारच्या मिरवणुकीत मोठ्या, कर्णकर्कश्य आवाजातील ध्वनिवर्धकांवर निर्बंध लादावेत अशी मागणी पुणेकरांकडून होत आहे. त्यासंदर्भात गणेश मंडळांसोबत झालेल्या सभेमध्ये आयुक्तांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. खरे तर त्यांच्यावर कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे.  उलट *लोकप्रतिनिधी आणि पुण्याच्या प्रथम नागरिक मंजुषा नागपुरे  यांनी ' माझ्या कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही'* अशी भूमिका सोशल मीडियावर मांडली आहे. पत्रकार परिषदेतील त्यांची भूमिका सुद्धा मोधम होती. *कर्णकर्कश्य, आरोग्यास घातक आणि बेकायदेशीर डिजे / डॉल्बी यास बहुसंख्य पुणेकरांचा विरोध असून आम आदमी पार्टी या मागणीला पाठिंबा देते.* ' असे मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.

ध्वनीच्या संदर्भामध्ये देशभरात कायद्याने स्थानानुसार 55 ते 65 डेसिबल दरम्यान कमाल पातळी ची मर्यादा स्पष्ट केलेली आहे. यासंदर्भात न्यायालयीन निर्णयही आलेले आहेत. *या सगळ्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्यत्वे महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि महापौर महापौर यांच्या वरती आहे. परंतु याबाबत कायदा पाळायचे नाही असे धोरण आयुक्त आणि महापौर यांचे आहे का?* असे आम आदमी पार्टी ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

शहरातील ध्वनी प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो तसेच काना संदर्भात अनेक समस्या निर्माण होतात. लहान मुलांना,ज्येष्ठांना याचा अधिक त्रास होतो. रुग्णांसाठी ही मोठी समस्या असते. यामुळे ध्वनी प्रदूषणाबाबतीत नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. 

सर्वच जात धर्मांचे सण हे उत्साहाने साजरे व्हायला पाहिजेत यात शंका नाही परंतु हे करत असताना पारंपरिक वाद्य आणि साधने वापरावीत. पुण्याचा गणेशोत्सव हा महाराष्ट्रासाठी आकर्षणाचा बिंदू असतो व हजारो लोक ही मिरवणूक सजावट,वादन,नृत्य पाहण्यासाठी पुणे शहरात येतात. मोठ्या डीजे डॉल्बी वा अश्लील नृत्य पाहण्यासाठी वा ऐकण्यासाठी ते येत नाहीत याची नोंद सर्वांनी घेणे आवश्यक आहे. असेही आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी यासंदर्भात सांगितले.

 

 


 Give Feedback



 जाहिराती