सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
  • माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
  • नेपाळच्या महापुरात पुण्याचे ४ पर्यटक अडकले; ट्रॅव्हल कंपनीने साथ सोडल्याचा तरुणीचा आरोप, सरकारकडे मदतीची आर्त हाक
 शहर

पुण्यात मराठा आरक्षणावरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री राधाकृष्ण विखे पा यांना थेट सवाल! उत्तर द्या!

गजानन मेनकुदळे    31-08-2026 15:42:17

पुणे : पुण्यात आज भाजपच्या कार्यकारिणी शिबिरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीला उद्देशून मराठा क्रांती मोर्चाने शहरातील विविध ठिकाणी तसेच मुख्यमंत्री येणार असलेल्या मार्गावर आक्रमक फ्लेक्स व होर्डिंग्ज लावून सरकारला थेट प्रश्न विचारले आहेत.

“कुणबी नोंद नसलेल्या मराठ्यांच्या ‘मराठा’ म्हणून मिळालेल्या SEBC आरक्षणाचे काय?” असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना करण्यात आला आहे.मुख्यमंत्री आज पुण्यात असताना या महत्त्वाच्या प्रश्नावर ते काय भूमिका मांडतात, जर उत्तर मिळाले नाही तर आजच्या कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होणार का याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती