सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय
  • मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
  • स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
  • पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी पुण्यात मोठी कारवाई, मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक, अमित ठाकरेंवरही गुन्हा
 शहर

वारीथॉन -२०२६' राष्ट्रीय हॅकाथॉनला चांगला प्रतिसाद'; मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम; १ लाख रुपयांच्या पारितोषिकांचे वितरण

डिजिटल पुणे    01-09-2026 12:44:10

पुणे: मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,कर्वेनगर,पुणे येथील इलेक्ट्रॉनिक  अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातर्फे आयोजित 'वारीथॉन- २०२६'  या राष्ट्रीय  हॅकाथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला.उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित पटाईत आणि  पराग कापरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. सचिन साखरे, उपप्राचार्या प्रा. स्वाती देशमुख, सौ.अदिती गणगे ,ई अँड टीसी विभागप्रमुख व कार्यक्रम समन्वयक डॉ. अंजली भातलवंडे, तसेच विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि सहभागी उपस्थित होते. २४ तासांच्या या हॅकाथॉनची सांगता प्रमुख पाहुणे राहुल प्रकाश दिघे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी चारही विषयांतील एकूण १२ विजेत्या संघांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरव करण्यात आला . एकूण १ लाख रुपयांची  पारितोषिके  प्रदान करण्यात आली.

 ८०० वर्षांच्या समृद्ध वारी परंपरेपासून प्रेरणा घेत या उपक्रमाचे दि. २९ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले.हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी अनुभव, गर्दी व वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य व सुरक्षितता आणि मुक्त नवकल्पना या विषयांवर तंत्रज्ञानाधारित नाविन्यपूर्ण उपाय विकसित केले गेले.समारोप समारंभात डॉ. अंजली भातलवंडे यांनी वारीथॉन -२०२६ ची संकल्पना, उद्दिष्टे आणि संपूर्ण प्रवास याबाबत उपक्रमाची भूमिका अधोरेखित केली.

 


 Give Feedback



 जाहिराती