सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय
  • मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
  • स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
  • पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी पुण्यात मोठी कारवाई, मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक, अमित ठाकरेंवरही गुन्हा
 राज्य

कॉकरोच जनता पार्टीचा ५ सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा स्थगित; सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलनाचा निर्णय बदलला

डिजिटल पुणे    01-09-2026 18:09:35

नवी दिल्ली : जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने ५ सप्टेंबरला आयोजित केलेला दिल्ली मोर्चा मागे घेतला आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आंदोलकांविरोधातील गुन्ह्यांबाबत सकारात्मक भूमिका मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत आंदोलक विद्यार्थ्यांविरोधातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारकडून मिळालेल्या सकारात्मक आश्वासनाचा विचार करून मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं कॉकरोच जनता पार्टीकडून सांगण्यात आलं.

कॉकरोच जनता पार्टीच्या सौरव दास यांनी सांगितलं की, सरकारकडून आश्वासन मिळालं असून सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ५ सप्टेंबरचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नसल्याचं पक्षाला वाटत आहे.

सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल यांनी आंदोलकांना सरकारच्या आश्वासनाबाबत शंका असल्याने त्यांनी मोर्चाची घोषणा केल्याचं न्यायालयाला सांगितलं. सरकारने आता आपली भूमिका स्पष्ट केल्याने आंदोलकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असल्याचं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, “दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका घेतल्यास प्रश्न सहज सुटू शकतो,” अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सुनावणीवेळी केली. त्यामुळे हा वाद शांततेच्या मार्गाने सोडवण्याच्या दिशेने महत्त्वाची पावलं पडल्याचं मानलं जात आहे.थोडक्यात : केंद्र सरकारचं सकारात्मक आश्वासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कॉकरोच जनता पार्टीने ५ सप्टेंबरचा प्रस्तावित दिल्ली मोर्चा मागे घेतला आहे.


 Give Feedback



 जाहिराती