सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरे गटाच्या जोरदार युक्तिवादानंतर आज शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार; धनुष्यबाण चिन्हाचा वाद निर्णायक टप्प्यावर
  • : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणी होणार आहे
 क्राईम

पतीने दुसरं लग्न केल्याचा संताप; विरारमध्ये पहिल्या पत्नीचा दुसऱ्या पत्नीवर चाकू-त्रिशूळाने हल्ला

डिजिटल पुणे    02-09-2026 15:28:59

मुंबई : विरार पश्चिम परिसरात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली आहे. पतीने दुसरे लग्न करून नव्या पत्नीला घरी आणल्याने संतप्त झालेल्या पहिल्या पत्नीने तिच्यावर चाकू आणि त्रिशूळाने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात २२ वर्षीय कोमल अनिल सरोज जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पहिली पत्नी लक्ष्मी हिला अटक केली आहे.

विरार पश्चिममध्ये घडला प्रकार

ही घटना विरार पश्चिम येथील बोलिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार प्रसाद हे पहिली पत्नी लक्ष्मीपासून वेगळे राहत होते. त्यानंतर त्यांनी कोमल अनिल सरोज हिच्यासोबत दुसरे लग्न केले. कोमल मेफेयर गार्डन परिसरात राहत असल्याची माहिती आहे.पतीने दुसरे लग्न केल्यामुळे लक्ष्मी नाराज होती. घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास कोमल घरी एकटी असताना लक्ष्मी तेथे पोहोचली. यावेळी दोघींमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर लक्ष्मीने कोमलवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

चाकू आणि त्रिशूळाने हल्ला

पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मीने चाकूने कोमलच्या हातावर वार केला. त्यानंतर तिला खोलीत बंद करून तिच्या डोक्यावर आणि पाठीवर चाकू तसेच त्रिशूळाने हल्ला केल्याचा आरोप आहे.याशिवाय कोमलवर पेट्रोल ओतून तिला पेटवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. या हल्ल्यात कोमल गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पतीला व्हिडीओ कॉलवर दाखवला हल्ला

हल्ल्यादरम्यान लक्ष्मीने पती राजकुमार यांना व्हिडीओ कॉल केला आणि घडलेला प्रकार त्यांना दाखवल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजकुमार घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी जखमी कोमलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.

आरोपी महिलेला पोलिसांकडून अटक

घटनेची माहिती मिळताच बोलिंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लक्ष्मीला ताब्यात घेत अटक केली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती