सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • देव तारी त्याला कोण मारी! ना अन्न ना पाणी, तब्बल 9 दिवस मृत्यूशी झुंज, महापुरात अडकलेल्या 2 जणांची सुटका
  • ‘विद्यानंद बापटांची भूमिका योग्य’; डीजेच्या मुद्द्यावर शरद पवारांचा मोठा दावा, हल्लेखोरांनाही सुनावलं
 शहर

कमवा व शिका’ योजनेतून विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसोबत कौशल्य विकासाची संधी — प्राचार्य डॉ. पंडित शेळके

डिजिटल पुणे    04-09-2026 15:38:46

पुणे : ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांनी ‘कमवा व शिका’ योजना सुरू असून यासोबतच निर्भय कन्या अभियान, आपत्ती व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास यांसह ३३ हून अधिक विद्यार्थी विकासाभिमुख उपक्रम विद्यार्थी विकास मंडळातर्फे राबविण्यात येतात. तसेच आपत्तीच्या प्रसंगी केवळ बघ्याची भूमिका न घेता समोरच्या व्यक्तीला तातडीने मदत करण्याची सामाजिक जबाबदारी जबाबदारी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे असून ‘कमवा व शिका’ योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कामाची संधी मिळण्या बरोबरच स्वतःचा व्यक्तिमत्व व कौशल्य विकासाची संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे सहयोगी अधिष्ठाता व बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत ‘कमवा व शिका योजना’ उद्घाटन प्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते. यावेळी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंदा हासे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. रमाकांत कसपटे, रा.से.यो. कार्यक्रम डॉ. नागेश भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे यांनी ‘कमवा व शिका’ योजनेचा विस्तार, उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गवत काढणे, बागकाम करणे, प्रशासकीय फायलिंग, प्रोजेक्ट ड्राफ्टिंग, तांत्रिक उपकरणांचा वापर याची माहिती देण्यावर भर देण्यात आला.

सदर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. विजय बालघरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भारत राठोड यांनी विशेष उपस्थित राहत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रमाकांत कसपटे तर आभार प्रदर्शन डॉ. अरबाज सय्यद यांनी केले. यशस्वितेसाठी विद्यार्थी विकास मंडळातील समिती सदस्य प्रा. शीतल शेकडे, प्रा. गणेश कटारिया, प्रा.वैभव बांगले तसेच प्रा. संतोष सास्तुरकर, प्रा. महेश खरात, प्रा.प्रविण खाडे यांनी परिश्रम घेतले असून प्रणित पावले यांनी विशेष तांत्रिक सहकार्य केले.


 Give Feedback



 जाहिराती