सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • देव तारी त्याला कोण मारी! ना अन्न ना पाणी, तब्बल 9 दिवस मृत्यूशी झुंज, महापुरात अडकलेल्या 2 जणांची सुटका
  • ‘विद्यानंद बापटांची भूमिका योग्य’; डीजेच्या मुद्द्यावर शरद पवारांचा मोठा दावा, हल्लेखोरांनाही सुनावलं
 शहर

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन व संस्था वर्धापन दिनानिमित्त 'मिनी मॅरेथॉन' संपन्न; १०० विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग

डिजिटल पुणे    04-09-2026 16:58:52

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या  मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन आणि संस्था वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले होते. 'सुदृढ युवक, सुदृढ भारत' हा संदेश देत आयोजित केलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयातील १०० हून अधिक मुले आणि मुलींनी अत्यंत उत्साहाने धावत आपला सहभाग नोंदवला. 

उत्साहाने सजला मॅरेथॉन मार्ग:

बुधवारी  सकाळी या मिनी मॅरेथॉनला सुरुवात झाली. मुख्य पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. कोथरूड परिसरातील ठराविक मार्गावरून धावत विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली. संपूर्ण मार्गावर स्वयंसेवकांकडून धावपटूंसाठी पाणी आणि प्रथमोपचाराची चोख व्यवस्था करण्यात आली होती.

 या कार्यक्रमाप्रसंगी  परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे मा. अजय मारणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, "खेळ आपल्याला केवळ शारीरिकदृष्ट्या सुदृढ बनवत नाही, तर आयुष्यात जिद्द आणि शिस्तही शिकवतो." माजी विद्यार्थी म्हणून महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुले आणि मुलींच्या गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि शैक्षणिक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी  खालील मान्यवर उपस्थित होते-डॉ. सपना राणे, डॉ. श्रीनिवास इप्पलपल्ली, डॉ. शुभांगी आवटी,प्रा. संतोष मोरे, डॉ. आदिनाथ पाठक, प्रा. अरुण शिंदे, प्रा. नरेंद्र केदारी, श्री. आशिष परमार.

 स्पर्धेचे अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे डॉ. योगेश पवार व श्री. निखिल सातव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहभागी खेळाडूंचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

वरिष्ठ महाविद्यालय मुली

प्रथम- सुमन बावधने, द्वितीय -अंकिता धायगुडे,तृतीय- स्नेहल बोरकर

कनिष्ठ महाविद्यालय मुली

प्रथम- साक्षी सातपुते, द्वितीय - रेणुका वैराट, तृतीय-  वैष्णवी मैदर्गी

वरिष्ठ महाविद्यालय मुले

प्रथम- आर्यन चौधरी , द्वितीय- विवेक निमगिरी,तृतीय -रोहित जाधव

कनिष्ठ महाविद्यालय मुले

प्रथम -शंतनू क्षीरसागर , द्वितीय- प्रेम धनवे,तृतीय- विनायक माने


 Give Feedback



 जाहिराती