सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 शहर

सदाशिव पेठेतील SPM शाळेसमोर वाहतूक व्यवस्थेत बदल; ५० मीटर अंतरावर P1-P2 पार्किंगची व्यवस्था

डिजिटल पुणे    08-09-2026 12:13:07

पुणे : सदाशिव पेठेतील एस.पी.एम. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलसमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगची समस्या लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेच्या परिसरात रिक्षा तसेच दुचाकी वाहने अव्यवस्थितपणे पार्क केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दत्तवाडी वाहतूक विभागाच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरात शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच रस्त्याच्या कडेला होणाऱ्या अनियंत्रित पार्किंगमुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यात अडचणी येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका तसेच अग्निशमन वाहनांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था बदलणे आवश्यक असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर एस.पी.एम. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल, सदाशिव पेठ, पुणे समोरील रस्त्यावर ५० मीटर अंतरावर P1 आणि P2 पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. नागरिकांनी शाळेसमोरील रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्तपणे उभी न करता उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायी पार्किंग व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार हा आदेश काढण्यात आला आहे. वाहतूक बदलामुळे वाहनांची ये-जा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची सुरक्षितता वाढण्याची अपेक्षा आहे.

वाहतूक शाखेने या निर्णयाबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती मागवल्या आहेत. दिनांक ७ सप्टेंबर २०२६ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लेखी स्वरूपात सूचना व हरकती कळवता येणार आहेत. प्राप्त सूचना आणि हरकतींचा विचार करून तसेच आवश्यकतेनुसार सेवेतील वाहने, फायब्रिज, पोलीस वाहने आणि रुग्णवाहिका यांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.नागरिकांनी पर्यायी मार्गाचा आणि पार्किंग व्यवस्थेचा वापर करून वाहतूक कर्मचारी व मदतनीस यांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती