सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 शहर

‘कृष्णार्पण’कथक नृत्याविष्कार १२ सप्टेंबर रोजी

डिजिटल पुणे    08-09-2026 15:25:08

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ,वृंदावन कथक नृत्यालय आयोजित ‘कृष्णार्पण’ हा कथक नृत्याविष्कार शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता  भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता,पुणे  येथे  सादर करण्यात येणार आहे. ‘कृष्णार्पण’ या कार्यक्रमातून विदुला बाळवेकर आणि त्यांच्या शिष्यांचा कथक नृत्याविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे आणि कथक नृत्यशैलीतील भाव,ताल,लय व अभिनयाचे सादरीकरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा ३०४ वा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला सर्वांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती