सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 DIGITAL PUNE NEWS

72 वर्षांचा इतिहास बदलणार! राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा प्रथमच दिल्लीबाहेर; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’समोर होणार दिमाखदार कार्यक्रम

डिजिटल पुणे    08-09-2026 19:06:22

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा एका ऐतिहासिक बदलाचा साक्षीदार ठरणार आहे. तब्बल 72 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा पुरस्कार सोहळा देशाची राजधानी नवी दिल्लीबाहेर आयोजित करण्यात येणार आहे. गुजरातमधील एकता नगर (केवडिया) येथे असलेल्या भव्य ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या सान्निध्यात 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

येत्या 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन प्रामुख्याने दिल्लीतील विज्ञान भवनात होत आले आहे. त्यामुळे यंदाचा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेश

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा देशाच्या विविध भागांत आयोजित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना पुढे नेणे, देशातील प्रादेशिक वैविध्य अधोरेखित करणे आणि विविध राज्यांच्या सांस्कृतिक योगदानाला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.1954 मध्ये सुरू झालेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी एक आहे. सात दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच सोहळ्याचे ठिकाण बदलण्यात आल्याने यंदाच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

यामी गौतम, मामुटी आणि कार्तिक आर्यनचा गौरव

2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटांमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार आणि चित्रपटांचा गौरव करण्यात आला आहे.

- सर्वोत्कृष्ट चित्रपट : ‘आर्टिकल 370’

- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : यामी गौतम – ‘आर्टिकल 370’

- सर्वोत्कृष्ट अभिनेता : मामुटी – ‘ब्रह्मयुगम’ आणि कार्तिक आर्यन – ‘चंदू चॅम्पियन’

- सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक : रणदीप हुड्डा – ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’

- सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म : ‘भंगार’

- सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री : ‘राम-नामी’

प्रादेशिक सिनेमाचाही ठसा

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचे योगदानही ठळकपणे समोर आले आहे. मराठी, संथाली, तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, तुळू आणि गढवाली भाषांमधील उल्लेखनीय चित्रपटांना विविध श्रेणींमध्ये गौरवण्यात आले आहे.विशेष म्हणजे, नॉन-फीचर फिल्म श्रेणीमध्ये पहिल्यांदाच संथाली भाषेतील चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळणार आहे. यामुळे भारतीय सिनेमातील भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याला आणखी मोठे व्यासपीठ मिळाले आहे.

‘कल्कि 2898 एडी’सह गाजलेल्या चित्रपटांनाही पुरस्कार

यंदाच्या पुरस्कारांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अनेक मोठ्या चित्रपटांचाही समावेश आहे. ‘कल्कि 2898 एडी’, ‘अमरन’, ‘पुष्पा 2: द रुल’, ‘भूल भुलैया 3’ आणि ‘स्त्री 2’ या चित्रपटांनी विविध पुरस्कार श्रेणींमध्ये आपली छाप पाडली आहे.

संजीव श्रीवास्तव ठरले सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक

चित्रपटावरील उत्कृष्ट लेखन आणि समीक्षणासाठी संजीव श्रीवास्तव यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.दिल्लीच्या पारंपरिक ठिकाणाऐवजी गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या भव्य पार्श्वभूमीवर होणारा हा सोहळा त्यामुळे केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम न राहता भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रादेशिक विविधता आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेश देणारा महत्त्वपूर्ण सोहळा ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती