सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 शहर

चिराग पासवान यांना जीवे मारण्याच्या धमकीचा पुण्यात निषेध

डिजिटल पुणे    09-09-2026 12:11:08

पुणे : लोकजनशक्ती पार्टी (रामविलास)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय अन्न प्रक्रिया व उद्योगमंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या घटनेचा पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. पक्षाच्या एससी, एसटी सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय आल्हाट  यांनी या घटनेचा निषेध करत चिराग पासवान यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली. धमकीमागील नेमके कारण आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

लवकरच राज्यपाल यांना भेटून पत्र देणार आहोत,असेही त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देण्यात आले असून, त्याची प्रत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधी व केंद्रीय मंत्र्यांना धमक्या देण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती