सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 जिल्हा

डोक्यावर फेटा, कपाळावर टिळा अन् हातात वीणा;देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती

डिजिटल पुणे    10-09-2026 16:08:21

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश देण्यासाठी नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भव्य गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शाडूच्या मातीपासून गणरायाची मूर्ती साकारत नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

फडणवीसांनी साकारलेल्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणरायाच्या डोक्यावर फेटा, कपाळावर टिळा आणि हातात वीणा असा आकर्षक स्वरूपात हा बाप्पा घडवण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मूर्ती साकारल्याने कार्यशाळेतील विद्यार्थी आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन देणे आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता.या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, पंकजा मुंडे, मंदा म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांनीही शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला पाठिंबा दिला.

या भव्य कार्यशाळेत तब्बल ६ हजार ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या.वाशी येथे झालेल्या या उपक्रमातून पर्यावरणाचे संरक्षण, प्रदूषणाला आळा आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप मिळाले.


 Give Feedback



 जाहिराती