सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 जिल्हा

कुर्ल्यात आरोग्य व्यवस्थेचा धक्कादायक प्रकार! घरी प्रसूतीनंतर रक्तस्त्राव, नाळ न कापताच महिलेचा रुग्णालयापर्यंत चादरीतून प्रवास

डिजिटल पुणे    10-09-2026 17:21:42

मुंबई : कुर्ला पश्चिमेतील बैल बाजार परिसरात बुधवारी पहाटे आरोग्य व्यवस्थेची गंभीर स्थिती समोर आली. एका महिलेची घरातच अचानक प्रसूती झाली. प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तातडीने वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधला. मात्र, वेळेत मदत न मिळाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

महिलेची प्रसूती पुढील महिन्यात अपेक्षित होती. त्यासाठी ती कुर्ला पश्चिम येथील माहेरी आली होती. मात्र, बुधवारी पहाटे अचानक प्रसूती झाल्याने घरातच बाळाचा जन्म झाला. त्यानंतर महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने कुटुंबीयांनी नजीकच्या महापालिका प्रसूतिगृहाशी संपर्क साधला.

मदत न मिळाल्याचा आरोप

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्रसूतिगृहाकडून घराजवळ वैद्यकीय पथक पाठविण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, डॉक्टर किंवा परिचारिका तातडीने मदतीसाठी पोहोचले नसल्याचा आरोप आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने कुटुंबीयांनी पोलिसांचीही मदत घेतली.

नाळ न कापलेल्या अवस्थेत चादरीतून रुग्णालयात

अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने महिलेची नाळ न कापलेल्या अवस्थेतील अवस्था सांभाळत तिला चादरीत गुंडाळून रुग्णालयात नेण्यात आले. अरुंद गल्ल्यांमधून चादरीतून महिलेला नेतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

रुग्णालयात उपचाराबाबतही कुटुंबीयांचा आरोप

रुग्णालयात पोहोचल्यानंतर सुरुवातीला उपचार मिळण्यास विलंब झाल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आणि घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर उपचार सुरू झाल्याचा दावा करण्यात आला.

दरम्यान, महिलेचे घर अत्यंत अरुंद आणि दाटीवाटीच्या परिसरात असल्याने रुग्णवाहिका तेथे पोहोचण्यास अडचण आली असावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. महिलेने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले.

आई आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर

मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिचे नवजात बाळ सध्या स्थिर असून दोघांवरही आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत.


 Give Feedback



 जाहिराती