सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 जिल्हा

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या निगराणीसाठी २४ तास वैद्यकीय पथक कार्यरत;मंगळवारपासून सलाईनद्वारे उपचार

डिजिटल पुणे    10-09-2026 18:05:49

जालना : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट २०२६ पासून अंतरवाली सराटी येथे अन्न व पाण्याविना उपोषण करीत आहेत. त्यांच्या आरोग्य तपासणी व उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत आहेत. काल श्री. जरांगे पाटील यांना सात सलाईन लावण्यात आल्या. आज दुपारीही त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांना एक सलाईन लावण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आऱोग्य यंत्रणेने दिली आहे.

वैद्यकीय पथकाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३५ वाजता त्यांची वैद्यकिय तपासणी केली. यावेळी त्यांची प्रकृती सर्वसाधारण मध्यम स्वरूपाची असल्याचे आढळले. त्यांना ८ सप्टेंबर रोजी सात बाटल्या आयव्ही फ्ल्यूड सलाईन देण्यात आले. तसेच आज दुपारीही श्री. जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांना १ सलाईन लावण्यात आली असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

उपोषणाचा बारावा दिवस असल्याने संभाव्य आरोग्यविषयक धोके श्री. जरांगे यांना समजावून सांगण्यात आले आहेत. तथापि, त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास संमती दिलेली नसल्याचे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.


 Give Feedback



 जाहिराती