सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 क्राईम

पालघर रुग्णालय राडा प्रकरणात मोठी कारवाई; आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी

डिजिटल पुणे    12-09-2026 16:40:28

पालघर : पालघर येथील रिलीफ रुग्णालयात दहीहंडीच्या दिवशी झालेल्या कथित राडा प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात आमदारपुत्र रोहित राजेंद्र गावित याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी मीरा रोड येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शनिवारी त्याला पालघर येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

प्रभारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. चाळकर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने रोहित गावितला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत पोलिसांकडून त्याची चौकशी करून प्रकरणातील त्याची भूमिका आणि इतर बाबींचा तपास केला जाणार आहे.

दरम्यान, रुग्णालयातील गोंधळाच्या प्रकरणात आतापर्यंत एकूण १४ जणांना अटक करण्यात आली असून संबंधित सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत. दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथकातील सदस्यांच्या उपचारावरून रिलीफ रुग्णालयात वाद निर्माण झाल्याचा आरोप आहे. यावेळी काही व्यक्तींनी रुग्णालयात प्रवेश करून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा तसेच कर्मचारी विवेक झिंगा यांना मारहाण केल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.

रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीनंतर पालघर पोलीस ठाण्यात शिवसेना पदाधिकारी आणि अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेनेनेही काही पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

प्रकरणातील निलंबित पालघर शहरप्रमुख राहुल घरत याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर तपासादरम्यान सुरुवातीला एफआयआरमध्ये नमूद असलेल्या अनोळखी व्यक्तींची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आणखी १२ जणांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. या सर्वांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अटकपूर्व जामिनावर १५ सप्टेंबरला सुनावणी

या प्रकरणातील साईराज पाटील, राहुल संखे आणि मनीष ऊर्फ विकी संखे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाने दिलासा नाकारला आहे. तर कुंदन संखे, शुभम बांदिवडेकर आणि नगरसेवक नीलम संखे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर १५ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

रुग्णालयातील या घटनेमुळे पालघरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. तपासादरम्यान पोलिसांकडून आणखी कोणती माहिती समोर येते आणि या प्रकरणात पुढे कोणावर कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती