सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 शहर

राज मुजावर यांना जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार

डिजिटल पुणे    15-09-2026 10:13:59

पुणे: अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व ज्युनिअर  कॉलेजचे प्राचार्य राज मुजावर यांना  शैक्षणिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने  जिल्हास्तरीय गुणवंत  मुख्याध्यापक  पुरस्कार मिळाला आहे.पद्मावती, पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभ उत्साहात  झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषद, माध्यमिक विभाग  शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर हे होते. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर,महेश बर्दापुरकर,शिवाजी शिंदे,किशोर बोरसे,शिवाजी कामथे,प्रसाद गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.मुजावर हे ३१ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष, टीडीएफ चे ते राज्य प्रतिनिधी आहेत.पुणे शहर मुख्याध्यापक संघामध्ये उपाध्यक्ष पदावरही ते कार्यरत आहेत. 


 Give Feedback



 जाहिराती