सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 जिल्हा

गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

डिजिटल पुणे    15-09-2026 10:31:16

बेळगाव : गणेश चतुर्थीच्या उत्साहात शहरात भक्तिमय वातावरण असतानाच बेळगावमधील चव्हाट गल्ली परिसरात मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास दमोने यांच्या घरातून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. काही क्षणांतच आगीने संपूर्ण घराला वेढा दिला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने घरातील चौघांना वाचवता आले नाही.

या दुर्घटनेत गजानन दमोने (६५), शारदा दमोने (४५), भारती दमोने (५०) आणि रोशन दमोने (२१) यांचा मृत्यू झाला. तर प्रिया दमोने (२८) आणि गंगा दमोने (२५) या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, घरातील फ्रिजमध्ये बिघाड झाल्यानंतर स्फोट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने चव्हाट गल्ली परिसरावर शोककळा पसरली आहे.ही दुर्घटना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून, आगीचे नेमके कारण आणि दुर्घटनेमागील इतर बाबींचा तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती