सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 क्राईम

जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरुणावर गोळीबार; पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ, दोघांना अटक

डिजिटल पुणे    15-09-2026 13:12:11

पिंपरी चिंचवड : जुन्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून झालेल्या भांडणाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी परिसरात घडली. ओलियो हॉटेलजवळ एका तरुणावर पिस्तूलातून गोळी झाडून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.या प्रकरणी चिखली पोलिसांनी स्वप्नील कांताराम जाधव आणि त्याचा चालक रोशन पिंगळे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवी धनाजी घोगरे हे 14 सप्टेंबर रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास जाधववाडी येथील ओलियो हॉटेलजवळ आले होते. यावेळी जुन्या आर्थिक व्यवहारावरून त्यांचा आरोपींसोबत वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपी स्वप्नील जाधव याने ‘तुला आज जिवंत सोडत नाही’ अशी धमकी देत पिस्तूलातून घोगरे यांच्या दिशेने गोळी झाडल्याचा आरोप आहे.या गोळीबारात घोगरे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले लोखंडी पिस्तूल, जिवंत राऊंड, वाहन आणि मोबाईल फोन जप्त केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून झालेल्या या गोळीबारामुळे जाधववाडी परिसरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती