पुणे : पुणे शहरातील वाढते प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून ‘Safe Road PUNE 2026’ या रस्ता सुरक्षा व वाहतूक जनजागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालक, विद्यार्थी आणि नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी API प्रशांत खेडकर आणि त्यांच्या पथकाने कात्रज-कोंढवा रोडवर रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी Cautionary Sign Board बसविले. तसेच योग्य ठिकाणी यू-टर्नची व्यवस्था करून वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय राजेश सोसायटी परिसरातील गणेश मंडळांना भेटी देऊन रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.
विमानतळ वाहतूक विभागाच्या PI संगीता जाधव यांनी न्यू एअरपोर्ट रोडवरील सिम्बायोसिस स्कूल चौक येथे विद्यार्थी तसेच वाहनचालकांसाठी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेतला. यावेळी सुरक्षित वाहनचालकत्व आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.दरम्यान, स्वारगेट वाहतूक विभागाचे API कुंभार आणि त्यांच्या पथकाने सेलेसबरी पार्क परिसरातील गणेश मंडळांना भेटी देत रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.
वाहतूक पोलिसांनी वाहनचालक आणि नागरिकांना दुचाकी चालवताना दर्जेदार हेल्मेट वापरणे, रस्ता ओलांडताना पादचारी मार्ग व झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे, सिग्नलचे पालन करणे, अतिवेग टाळणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे, असे आवाहन केले आहे.अपघात घडल्यास जखमी व्यक्तीला तातडीने मदत करून वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही पोलिसांनी सांगितले. वाहतूक नियमांचे पालन ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला आहे.‘Safe Road PUNE 2026 – सुरक्षित रस्ता, सुरक्षित प्रवास, सुरक्षित पुणे’ या उपक्रमातून पुणे शहरातील रस्ता सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.

*पुणे शहरातील वाढते प्राणांकित अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी
1) भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी API प्रशांत खेडकर व त्यांची टीम यांनी कात्रज कोंढवा रोडवर रस्ता सुरक्षाविषयक बोर्ड (Cautionary sign board) बसवून योग्य ठिकाणी यू टर्न देऊन वाहतूक सुरळीत व सुरक्षित केली आहे * व राजेश सोसायटी येथील गणेश मंडळांना भेटी देऊन रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती व मार्गदर्शन केले
2) विमानतळ वाहतूक विभागाच्या PI श्रीमती संगीता जाधव यांनी सिम्बॉयसिस स्कूल चौक न्यू एअरपोर्ट रोड येथे कॉलेजची मुले तसेच वाहन चालक यांना रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन केले.
3) स्वारगेट वाहतूक विभागाचे API कुंभार व त्यांची टीमने सेलेसबरी पार्क येथील गणेश मंडळांना भेटी देऊन रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती व मार्गदर्शन केले
वाहनचालक व नागरिकांना खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येते
1. दुचाकी चालविताना नेहमी दर्जेदार हेल्मेटचा वापर करावा.
2. रस्ता ओलांडताना पादचारी मार्ग व झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा .
3. वाहतूक सिग्नलचे काटेकोरपणे पालन करावे.
4. अतिवेगाने वाहन चालवू नये. वेगावर नियंत्रण ठेवावे.
5. वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये.
6. रस्त्यावर अपघात झाल्यास जखमी व्यक्तीस तातडीने मदत करून वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत .
वाहतूक नियमांचे पालन ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे.
सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करा!
“Safe Road PUNE 2026–सुरक्षित रस्ता, सुरक्षित प्रवास, सुरक्षित पुणे
पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर .