सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
 क्राईम

रायगडमध्ये 17 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचाराचा आरोप; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, दोघे अल्पवयीन

डिजिटल पुणे    18-09-2026 15:36:00

रायगड : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर म्हसळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलीच्या ओळखीतील काही तरुणांनी तिला धमकावून तसेच फसवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. याशिवाय, एप्रिल ते जून 2026 या कालावधीत तिच्या घराचे बांधकाम करणाऱ्या 40 वर्षीय मिस्त्रीने घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत जबरदस्तीने घरात प्रवेश करून अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी म्हसळा पोलिसांनी गु.र.नं. 131/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेतील कलम 64(2)(ड), 376(2) तसेच पोक्सो कायद्यातील कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, म्हसळा तालुक्यातच 23 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची आणखी एक घटना समोर आली होती. त्यामुळे अल्पावधीत घडलेल्या या घटनांमुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती