सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंधभक्तांची जमात फोफावत चाललीय, त्यांना कायद्याची भीती राहिली नाही का? बिहारमधील जमुई येथील प्रकाराबाबत रोहिणी खडसेंकडून संताप व्यक्त
  • मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; देशात पावसाची 15 टक्के तूट, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज
 शहर

खेळातून शिक्षण, आनंदातून मूल्यसंस्कार; ‘आनंदाचा शनिवार’ उत्साहात, सासवडमध्ये अभिनव उपक्रम

डिजिटल पुणे    21-09-2026 11:56:24

सासवड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सासवड नगरपालिका शिक्षण विभाग संचलीत पीएमश्री संत नामदेव महाराज विद्यालय, शाळा क्रमांक ५, सासवड येथे विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदाचा शनिवार’ हा अभिनव उपक्रम उत्साहात घेण्यात आला.

नेहमीच्या शालेय वातावरणापेक्षा वेगळा अनुभव देण्यासाठी विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी वही पुस्तक न आणता खेळ, मनोरंजन आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून शिकण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, मूल्यशिक्षण तसेच वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपक्रमात बोबडी वळाली, संगीत खुर्ची, गमतीशीर ओळख आणि कप टॉवर यांसारखे विविध खेळ घेण्यात आले. बोबडी वळाली च्या माध्यमातून उच्चारक्षमता, एकाग्रता व वाणी-मेंदू समन्वय विकसित, संगीत खुर्चीमधून चपळता, तत्परता व एकाग्रता, तर कप टॉवर या सांघिक खेळातून संघभावना, समन्वय, नेतृत्व आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आला.

रासेयो स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेतल्या. खेळ आणि आनंदाच्या वातावरणातून विद्यार्थ्यांना शिस्त, स्वच्छता, सहकार्य आणि सामाजिक मूल्यांचे महत्त्व समजावून देण्यात आले.

या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांना आनंददायी व अनुभवाधारित शिक्षणाचा अनुभव मिळाला, तर रासेयो स्वयंसेवकांना विविध वयोगटातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, उपक्रमांचे नियोजन व व्यवस्थापन करणे आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळाली.

वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाने आणि सासवड नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमामधे इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, डॉ. बबन माने व समन्वयक डॉ. नरसिंग गिरी यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी रासेयो विभागातून प्रा. शुभम ठोंबरे तसेच संत नामदेव महाराज विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नवगिरे व त्यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाला स्वयंसेवकांमधून प्रणव भगत व निकिता इंगळे यांनी परिश्रम घेतले व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


 Give Feedback



 जाहिराती