सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंधभक्तांची जमात फोफावत चाललीय, त्यांना कायद्याची भीती राहिली नाही का? बिहारमधील जमुई येथील प्रकाराबाबत रोहिणी खडसेंकडून संताप व्यक्त
  • मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; देशात पावसाची 15 टक्के तूट, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज
 जिल्हा

‘सेवा संकल्प अभियान’ चित्ररथाचा शुभारंभ; आदिवासी विकास विभागाच्या योजनांची जनजागृती

डिजिटल पुणे    21-09-2026 12:07:25

सोलापूर :  महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्ररथ उपक्रमाचा सोलापुरात शुभारंभ करण्यात आला. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६  या कालावधीत राज्यभर हे अभियान राबविण्यात येत असून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांच्या वतीने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

बी.एस.एन.एल. इमारत, संगमेश्वर महाविद्यालय, सात रस्ता परिसर येथे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकडे यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, वसतिगृह कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

चित्ररथाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. यामध्ये वनहक्क कायदा (FRA), राबरी महामंडळाच्या स्वयंरोजगार योजना, महिला बचत गट सक्षमीकरण, न्यूक्लियस बजेट, ठक्कर बापा आदिवासी वस्ती सुधार योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना तसेच शिक्षण व परीक्षा शुल्क योजनांचा समावेश होता.

यावेळी उपस्थित नागरिकांना योजनांची माहिती दर्शविणारे फलक, बॅनर्स आणि माहितीपत्रकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे अधिकारी-कर्मचारी, विविध योजनांचे लाभार्थी आणि महिला बचत गट सदस्यांच्या सहभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क चौकापर्यंत जनजागृती फेरीही काढण्यात आली.प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी आदिवासी बांधवांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या अभियानामुळे योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास मदत होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती