सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

पुण्यात द्वादश ज्योतिर्लिंगांच्या संकल्पनेवर आधारित ‘ज्योतिर्लिंगम् ’ २७ सप्टेंबरला नृत्याविष्कार

डिजिटल पुणे    22-09-2026 13:21:09

पुणे : भारतातील बारा ज्योतिर्लिंगांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा नृत्याच्या माध्यमातून वेध घेणारा ‘द्वादश ज्योतिर्लिंगम् ४.०’ हा विशेष नृत्याविष्कार रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील द बॉक्स टू, एरंडवणे, नळस्टॉप मेट्रो स्थानकाजवळ येथे सादर होणार आहे. कलावर्धिनी  आणि डॉ. उषा आर. के. यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची भूमिका निलावा सेन, मध्य प्रदेशातील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची भूमिका हिमांशू श्रीवास्तव आणि महाराष्ट्रातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची भूमिका शशांक किरण नायर साकारतील.

कार्यक्रमासाठी सुजेश मेनन यांचे गायन, दक्षिणामूर्ती पिल्लई यांचे मृदंगवादन, अजय चंद्रमौळी यांचे व्हायोलिन आणि प्रजेश यांचे नाट्टुवांगम असे संगीत संयोजन आहे. तसेच पखवाज वादक उस्ताद कृष्णा साळुंखे यांच्या विशेष ‘समर्पण’ रचनेचे सादरीकरण कलावर्धिनी, पुणेच्या नर्तकांकडून करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला आर्मी वुमेन्स वेल्फेअर असोसिएशन, पुणेच्या प्रादेशिक अध्यक्षा श्रीमती अनुपमा पुष्कर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. ऋषिकेश येथील कीर्ती हेरिटेजच्या माँ ज्ञान सुवीरा यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘द एन्ग्मा ऑफ द एन्डलेस रेडियंट कॉलम’ या संकल्पनेवर आधारित या नृत्याविष्कारातून भारतभरातील बारा ज्योतिर्लिंगांची आध्यात्मिक परंपरा, त्यामागील तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक वैविध्य नृत्य, संगीत आणि रंगमंचीय मांडणीच्या माध्यमातून उलगडले जाणार आहे.‘द्वादश ज्योतिर्लिंगम् ४.०’ हा केवळ नृत्याचा कार्यक्रम नसून भारतीय अध्यात्म, पुराणपरंपरा, संगीत आणि नृत्यकलेचा संगम घडविणारा विशेष सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे. कार्यक्रमाची तिकिटे ‘टिकिट खिडकी’वर उपलब्ध आहेत.


 Give Feedback



 जाहिराती