सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

‘वस्त्र परंपरा’ प्रदर्शन २६ सप्टेंबर पासून पुण्यात

डिजिटल पुणे    23-09-2026 10:54:55

पुणे : भारताच्या विविध भागांतील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वस्त्रपरंपरा, कापड आणि हस्तकलेचा परिचय करून देणारा वस्त्र परंपरा  हे प्रदर्शन दि . २६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुण्यातील हर्षल बँक्वेट्स, कर्वे रोड, कोथरूड येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.‘जिथे धागे परंपरेला जोडतात’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात भारतातील विविध राज्ये आणि प्रदेशांमधील पारंपरिक वस्त्रे, कापड आणि हस्तकलेच्या वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. आसाम, बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश, बनारस, कर्नाटक, काश्मीर, कोलकाता, राजस्थान आणि पंजाब आदी विविध भागांच्या वस्त्रपरंपरेतील वैविध्यपूर्ण कापड आणि कलाकुसर या प्रदर्शनात पाहता व खरेदी करता येणार आहे.

नवरात्रि आणि दसऱ्याच्या सणासुदीच्या काळात पारंपरिक भारतीय वस्त्रांना आणि कारागिरांच्या कलाकुसरीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच ग्राहकांना विविध प्रकारचे पारंपरिक कापड आणि वस्त्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवाचा उद्देश आहे.भारताच्या समृद्ध वस्त्रवारशावर विशेष भर देणाऱ्या ‘वस्त्रा परंपरा’च्या माध्यमातून विविध प्रांतांतील पारंपरिक विणकाम, नक्षीकाम, रंगसंगती आणि कारागिरी अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.प्रवेश आणि पार्किंग विनामूल्य आहे . 


 Give Feedback



 जाहिराती