सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

‘वस्त्र परंपरा’ प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन

डिजिटल पुणे    28-09-2026 12:11:22

पुणे :‘जिथे धागे परंपरेला जोडतात’ या संकल्पनेवर आधारित ‘वस्त्र परंपरा’ प्रदर्शनाचे उद्घाटन २६ सप्टेंबर रोजी पुण्यातील हर्षल बँक्वेट्स, कर्वे रोड, कोथरूड येथे   करण्यात आले. दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत हे प्रदर्शन पुणेकरांसाठी सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात आसाम, बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश, बनारस, कर्नाटक, काश्मीर, कोलकाता, राजस्थान आणि पंजाब आदी विविध राज्यांतील पारंपरिक वस्त्रे, कापड आणि हस्तकलेच्या वस्तू एकाच छताखाली पाहता व खरेदी करता येणार आहेत. भारताच्या समृद्ध वस्त्रवारशातील वैविध्यपूर्ण विणकाम, नक्षीकाम आणि रंगसंगती अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.उद्घाटनप्रसंगी बोलताना आयोजकांनी सांगितले की, नवरात्रि आणि दसऱ्याच्या सणासुदीच्या काळात पारंपरिक भारतीय वस्त्रांना आणि कारागिरांच्या कलाकुसरीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.


 Give Feedback



 जाहिराती