सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 जिल्हा

शेअर बाजाराच्या आमिषाने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस; अश्लील व्हिडिओची धमकी देत ब्लॅकमेल, नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं

डिजिटल पुणे    28-09-2026 18:47:41

नाशिक : शेअर बाजारात कामाचे आमिष दाखवून विवाहित महिलेच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस मिळवला. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. या मानसिक छळाला कंटाळून ३८ वर्षीय विवाहितेने जीवन संपवल्याची घटना घडली. या प्रकरणी तिच्या बहिणीच्या तक्रारीवरून संशयित कैलास ऊर्फ बंटी मिस्तरी याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये संशयिताने शेअर बाजारातील कामाचे आमिष दाखवत संबंधित महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतल्याचा आरोप आहे. या माध्यमातून व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवरून व्हिडिओ कॉल करत महिलेला विवस्त्र होण्यास भाग पाडले आणि त्याचे स्क्रीन रेकॉर्डिंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर या रेकॉर्डिंगचा आधार घेत आरोपी महिलेवर दबाव टाकत असल्याचा आरोप आहे. पोलिसांत तक्रार केल्यास तिच्या दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही महिलेच्या बहिणीने तक्रारीत म्हटले आहे. सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासामुळे महिला प्रचंड तणावात होती, अशी माहिती समोर आली आहे.

जीवन संपवण्यापूर्वी महिलेने दोन ते तीन पानांची चिठ्ठी लिहून आपली व्यथा मांडल्याचे पोलिसांनी सांगितले. या चिठ्ठीत तिने आपण एका मोठ्या जाळ्यात अडकल्याचे आणि आपल्याकडूनही चूक झाल्याचे नमूद केल्याची माहिती आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित कैलास ऊर्फ बंटी मिस्तरी याचा शोध सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शोध पथकाला आरोपीचा तातडीने शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती