सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

‘देव चालले’अभिवाचन ३ ऑक्टोबर रोजी

डिजिटल पुणे    29-09-2026 13:22:16

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. मोकाशी यांच्या ‘देव चालले’ या कादंबरीवर आधारित अभिवाचनाचा कार्यक्रम शनिवार,दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता येथे हे अभिवाचन होणार आहे. 

‘एलोमेनोपी निर्मित’ या कार्यक्रमाची  संहिता बांधणी आणि दिग्दर्शन सागर कानोले यांनी केले असून, संगीत गायन व वादनाची जबाबदारी यश गोखले आणि आशुतोष जोशी सांभाळणार आहेत. ध्वनी संयोजन ऋचा कुलकर्णी, तर प्रकाशयोजना सागर कानोले यांची आहे.या अभिवाचनात प्रतिभा दाते, रणजित मोहिते, आशुतोष जोशी, गौरी कुबेर, अमृता काळे, राहुल मोरे, यश गोखले आणि क्षितिज जहागीरदार हे कलाकार सहभागी होणार आहेत.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा ३०५ वा कार्यक्रम असून प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती  भारतीय विद्या भवन  चे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.   

दि. बा. मोकाशी यांच्या साहित्यकृतीला अभिवाचनाच्या माध्यमातून नव्या रंगमंचीय रूपात सादर करण्याचा हा प्रयत्न साहित्यप्रेमी आणि नाट्यरसिकांसाठी  आकर्षण ठरणार आहे. कार्यक्रमास सर्व रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती