सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

कोथरूडमध्ये मालमत्ता नोंदणीसह जलद दस्तनोंदणी सेवा ;पहिल्या 'मॉडेल सब रजिस्ट्रार ऑफिस' ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद !

डिजिटल पुणे    30-09-2026 16:56:47

पुणे : जलद दस्तनोंदणी सेवेसाठी कोथरूड येथे सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या 'मॉडेल सब रजिस्ट्रार ऑफिस'(सह-दुय्यम निबंधक कार्यालय) ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये या कार्यालयाचे उदघाटन झाले होते.पश्चिम नगरी रेव्होल्यूशन मॉल, सिटी प्राईड शेजारी  कोथरूड, पुणे येथील मॉडेल दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या मालमत्ता नोंदणी, लिव्ह अँड लायसन्स, पॉवर ऑफ अटर्नी , गिफ्ट डीड, रिलीज डीड तसेच इतर दस्तनोंदणी सेवांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना नोंदणी प्रक्रियेसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि सुविधाजनक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यालयात विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.या अत्याधुनिक आणि जलद सुविधांमुळे एका दस्त नोंदणी ला ४४२२ रुपये आणि जीएसटी आकारला जातो. 

नागरिकांच्या सोयीसाठी अपॉइंटमेंटवर आधारित सेवा, कार्पोरेट दर्जाच्या आधुनिक व वातानुकूलित सुविधा, वाय -फाय, दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश, त्याच दिवशी दस्तऐवज वितरण तसेच पारदर्शक सेवा शुल्काची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना प्रक्रियेची माहिती आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी कार्यालयीन पातळीवर आवश्यक सुविधा देण्यात आल्याने नोंदणी प्रक्रियेला अधिक सुलभता आली असल्याचे दिसून येत आहे.   

मालमत्ता व हस्तांतरणाशी संबंधित विक्रीखरेदी, पुनर्विक्री/हस्तांतरण, गिफ्ट डीड, रिलीज डीड आणि गहाणखत हस्तांतरण  यांसह करार व भाडेपट्ट्याशी संबंधित , निवासी व व्यावसायिक भाडेपट्टा तसेच डेव्हलपमेंट, री डेव्हलपमेंट करार  यांसारख्या सेवांचा नागरिकांना लाभ घेता येत आहे. तसेच पॉवर ऑफ अटर्नी, कायमस्वरूपी मुखत्यारपत्र आणि इच्छापत्र नोंदणीसारख्या इतर सेवाही उपलब्ध आहेत.

नोंदणीसाठी नागरिकांना प्रथम आयजीआर (IGR) महाराष्ट्रच्या पब्लिक डेटा एंट्री  पोर्टलवर आवश्यक माहिती भरता येते. त्यानंतर  नोंदणी शुल्क भरून अपॉइंटमेंट बुक करता येते. कोथरूड येथील कार्यालयाचा पत्ता ऑफिस नं. १४, चौथा मजला, पश्चिमनगरी, रेव्होल्यूशन मॉल, सिटी प्राईड शेजारी, कोथरूड, पुणे – ४११०३८ असा असून कार्यालयीन वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे.येथील सेवांसाठी ७३०४२४६११७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.दरम्यान,दस्त नोंदणीशी संबंधित समाजातील अनेक मान्यवरांना याबाबत माहिती दिली जात असून नुकतीच पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष एड.काळुराम भुजबळ यांना  या कार्यालयातील सुविधांची माहिती देण्यात आली .

 


 Give Feedback



 जाहिराती