सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

सोमेश्वर कारखान्यात तिरंगी सामना; राष्ट्रवादी-शिवसेना युती, जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात

डिजिटल पुणे    30-09-2026 17:16:37

पुणे : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार होणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आघाडी केली असून दोन्ही पक्षांकडून 21 उमेदवारांचे पॅनेल जाहीर करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी युतीची माहिती देत उमेदवारांची घोषणा केली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. विशेष म्हणजे, जगतापांच्या पॅनेलला भाजपची साथ मिळाली आहे. त्यामुळे कारखाना निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी-शिवसेना युतीसमोर भाजप-जगताप गटाचे आव्हान असणार आहे.

याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्यात राष्ट्रवादी-शिवसेना युती, भाजप-जगताप गट आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील शरद पवार गट अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी तीन प्रमुख पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याने सोमेश्वर कारखान्याची निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची बनली आहे. पुरंदर तालुक्यातील शरद पवार गटातील काही नेत्यांनी भाजप आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलला पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणांनाही वेगळे वळण मिळाले आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बंड करून पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीकडून महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. अजित पवारांचे नाव किंवा छायाचित्र कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय निवडणूक प्रचारात किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी वापरू नये, असे या परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.आता सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत कोणता गट बाजी मारणार आणि या तिरंगी लढतीचा निकाल बारामतीच्या राजकारणावर काय परिणाम करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती