सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात 16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
  • पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
  • आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदे गटाने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
  • ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
  • विद्यार्थी पुणे बंद करतील, मुंबईत मंत्रालयावर धडकतील; 2 दिवसांचा अल्टीमेटम देतोय, रोहित पवार आक्रमक
 DIGITAL PUNE NEWS

लंडनच्या मातीत कुंजीर तालमीच्या पै.युवराज खोपडे यांचा डंका!-आंतरराष्ट्रीय केसरी कुस्ती स्पर्धेत 95 किलो वजनी गटात सुवर्णपदक; पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा*

गजानन मेनकुदळे    01-10-2026 10:48:52

पुणे : जागतिक कुस्ती संघटना (UWW) यांच्या मान्यतेने यूकेमधील लंडन येथे 23 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय केसरी कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नाझरे गावचे सुपुत्र पै. युवराज मोहन खोपडे यांनी 95 किलो वजनी गटात दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम लढतीत युवराज यांनी यूकेच्या पैलवानावर चितपट विजय मिळवत भारतीय पारंपरिक मातीवरील कुस्तीचा ठसा लंडनच्या मातीत उमटविला.

 

युवराज खोपडे हे नाझरे गावचे सुपुत्र असून वस्ताद मोहन नाना खोपडे यांचे चिरंजीव आहेत. सध्या ते कुंजीर तालीम, पुणे येथे वस्ताद व उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. तसेच मुळशी केसरी गणेश कंधारे आणि पप्पू वांजळे गायकवाड वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखालीही त्यांनी सराव केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत युवराज यांनी ताकद, चपळाई, अचूक डावपेच आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

युवराज यांच्या या सुवर्णकामगिरीमुळे नाझरे गावासह जयनाथ तालिमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.धनकवडी भागातील नगरसेवक बाळासाहेब धनकवडे व ॲड विजय खोपडे यांनी लहानपणी त्यांच्या कडून योग्य परिश्रम करून घेतले.ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये असलेली गुणवत्ता, जिद्द आणि क्षमता योग्य प्रशिक्षण व कठोर परिश्रमांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकते, हे युवराज यांच्या यशातून अधोरेखित झाले आहे.

युवराज यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटनेचे अध्यक्ष नितीन बारणे, उपाध्यक्ष अमर गोगावले, सचिव मोहन नाना खोपडे आणि खजिनदार पोपट नलावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचे आजोबा विलास दादा खोपडे यांच्या प्रेरणेने तसेच काका राजू खोपडे यांच्या मार्गदर्शनातून आणि पाठबळातून शक्य झाले आहे. तसेच त्यांचे प्रशिक्षक, कुटुंबीय, नाझरे ग्रामस्थ आणि पुणे जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींकडूनही युवराज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लंडनच्या मातीत मिळवलेले हे सुवर्णपदक युवराज खोपडे यांच्या कुस्ती कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला असून, त्यांच्या या कामगिरीमुळे पुणे जिल्ह्यातील नवोदित मल्लांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या मातीत घडलेला हा मल्ल आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या मैदानावर आपली छाप उमटवत असल्याने ही कामगिरी पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाची ठरली आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती