सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवेआगरची सहल ठरली आयुष्यभराची काळी आठवण; आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत दाखल, पालकांचा आक्रोश
 क्राईम

पुण्यात उद्योजकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; पाठलाग करत वाहनाचीही तोडफोड, दोन दिवसांपूर्वी मागितली होती खंडणी

डिजिटल पुणे    01-10-2026 12:59:08

पुणे : हवेली तालुक्यातील कोलवडी परिसरात एका उद्योजकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सचिन लोणकर हे ऑफिसमधून बाहेर पडून आपल्या वाहनाकडे जात असताना दोघांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सचिन लोणकर हे कार्यालयातून बाहेर आले. ते वाहनाकडे जात असताना गजानन गायकवाड आणि आकाश अडसुळे हे दोघे कोयते घेऊन त्यांच्या दिशेने धावत आले. हल्लेखोरांना पाहताच लोणकर यांनी जीव वाचवण्यासाठी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने वार केले.

या हल्ल्यात लोणकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी त्यांच्या वाहनाचीही तोडफोड केल्याची माहिती आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान, या हल्ल्यामागे खंडणीचा प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दोन दिवस आधी गजानन गुलाब गायकवाड याने लोणकर यांची गाडी अडवून चार ते पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

‘तुझा सप्लायरचा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे पैसे देण्यास अडचण नाही,’ असे म्हणत खंडणी मागण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती