सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
  • आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदे गटाने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
  • ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
  • विद्यार्थी पुणे बंद करतील, मुंबईत मंत्रालयावर धडकतील; 2 दिवसांचा अल्टीमेटम देतोय, रोहित पवार आक्रमक
 क्राईम

‘प्रियकराला एड्स आहे, तरी त्याच्याशीच लग्न करणार’; पुण्यातील २२ वर्षीय तरुणी घरातून निघाली; कॉलेजला गेली अन् घरी ईमेल पाठवला!, ई-मेलमुळे खळबळ

डिजिटल पुणे    05-10-2026 14:03:11

पुणे : कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने हवेली तालुक्यात खळबळ उडाली आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या या तरुणीने कुटुंबीयांना पाठवलेल्या ई-मेलमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. ‘माझ्या प्रियकराला एड्स आहे, हे माहीत असूनही मी त्याच्याशीच लग्न करणार आहे,’ असा आशय ई-मेलमध्ये असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

हवेली तालुक्यातील एका गावात राहणारी ही तरुणी एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली. मात्र, संध्याकाळ उलटून गेल्यानंतरही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.

कुटुंबीयांनी महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी केली. परिसरातही तिचा शोध घेण्यात आला. मात्र, बराच वेळ प्रयत्न करूनही तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

‘एड्स असल्याचे माहीत असूनही त्याच्याशी लग्न करणार’

तरुणीचा शोध सुरू असतानाच तिच्या आई, भाऊ आणि लहान बहिणीला ई-मेल प्राप्त झाला. आपण एका तरुणासोबत घरातून निघून जात असून, संबंधित तरुणाला एड्स असल्याची माहिती असूनही त्याच्याशीच विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे, असे तिने ई-मेलमध्ये नमूद केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

ई-मेल समोर आल्यानंतर कुटुंबीयांची चिंता आणखी वाढली. तरुणी सध्या कुठे आहे, ती कोणासोबत आहे आणि ती सुरक्षित आहे का, याबाबत कुटुंबीयांकडून माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र तिच्याशी संपर्क होऊ न शकल्याने अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

फुरसुंगी पोलिसांकडून शोध सुरू

हा प्रकार फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. तरुणीच्या वडिलांनी पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, तरुणीच्या ई-मेलमधील माहितीच्या आधारे तिचा शोध घेतला जात आहे.

तरुणी ज्या तरुणासोबत गेल्याचा उल्लेख ई-मेलमध्ये आहे, त्याच्याबाबतही पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. तरुणीचा ठावठिकाणा आणि ती सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती