सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
  • आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदे गटाने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
  • ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
  • विद्यार्थी पुणे बंद करतील, मुंबईत मंत्रालयावर धडकतील; 2 दिवसांचा अल्टीमेटम देतोय, रोहित पवार आक्रमक
 जिल्हा

शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री पंकजा मुंडे

डिजिटल पुणे    05-10-2026 15:31:47

बीड : यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे बीड जिल्ह्यातील अकराही तालुक्यांवर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची उभी पिके करपली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी बीड व पाटोदा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी बीड तालुक्यातील वंजारवाडी, काकडहिरा, मुर्शदपूर, लिबांदेवी तसेच पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी नायगाव, रोहतवाडी, तांबा राजुरी, तळे पिंपळगाव, करंजवण आदी गावांमधील शेतशिवारात प्रत्यक्ष जात पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या व्यथा व अडचणी जाणून घेतल्या. या कठीण काळात शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. इतिहासात पहिल्यांदाच केंद्र आणि राज्याचे पारंपरिक निकष बाजूला सारून शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. प्रशासकीय यंत्रणेला पिकांच्या नुकसानीचे व पंचनाम्याचे काम अचूक आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तोंडावर आलेला सण पाहता, शासनाकडून शेतकऱ्यांच्या संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. तसेच ३२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी असो वा इतर मदत, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत शासनाच्या या संवेदनशील भूमिकेमुळे शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळाला असून, प्रशासनाकडून मदतीची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू असल्याचेही मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.


 Give Feedback



 जाहिराती