सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
  • आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदे गटाने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
  • ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
  • विद्यार्थी पुणे बंद करतील, मुंबईत मंत्रालयावर धडकतील; 2 दिवसांचा अल्टीमेटम देतोय, रोहित पवार आक्रमक
 क्राईम

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; व्हिडिओ कॉलनंतर व्यावसायिकाकडे ३.५० लाखांची मागणी

डिजिटल पुणे    05-10-2026 15:51:11

मुंबई : सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी झालेली मैत्री एका व्यावसायिकाला चांगलीच महागात पडल्याचा प्रकार गिरगाव परिसरात समोर आला आहे. इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीनंतर व्हिडिओ कॉलवर आक्षेपार्ह प्रकार घडला आणि त्यानंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडे तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

गिरगाव परिसरात मेटलचे दुकान चालवणाऱ्या या व्यावसायिकाची चार महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर एका महिलेशी ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये नियमित संवाद सुरू होता. हळूहळू या संवादाचे रूप मैत्रीत झाले. त्यानंतर संबंधित महिलेने व्यावसायिकाला अन्य एका इन्स्टाग्राम अकाउंटवरील महिलेशी संपर्क साधण्यास सांगितले.

व्यावसायिकाने सुरुवातीला त्यास नकार दिला. मात्र वारंवार आग्रह केल्यानंतर त्याने त्या अकाउंटशी संपर्क साधला. त्यानंतर एका रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ‘kanxi_maya’ या अकाउंटवरून त्याला व्हिडिओ कॉल आला. तक्रारीनुसार, कॉलदरम्यान समोर असलेल्या महिलेने व्यावसायिकाला कपडे काढण्यास सांगितले. त्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने तिच्या सांगण्यावरून त्याने कपडे काढले.

यानंतर काही दिवसांनी, २ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे दीड वाजता, एका अनोळखी व्यक्तीचा व्यावसायिकाला फोन आला. त्याच्याकडे व्यावसायिकाचा आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे ३.५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

सुरुवातीला पैसे दिल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास हा प्रकार थांबेल, असे व्यावसायिकाला वाटले. मात्र त्यानंतरही पैशांसाठी वारंवार दबाव आणण्यात आला. अखेर त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने पोलिस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. संबंधित इन्स्टाग्राम अकाउंट, फोन नंबर तसेच या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारामागे नेमके कोण आहेत, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात आणखी व्यक्ती सहभागी आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर मैत्री करताना सावध राहणे आणि संशयास्पद व्हिडिओ कॉल किंवा पैशांच्या मागणीला बळी न पडता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधणे, असे आवाहन सायबर सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येते.


 Give Feedback



 जाहिराती