सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात 16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
  • पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
  • आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदे गटाने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
  • ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
  • विद्यार्थी पुणे बंद करतील, मुंबईत मंत्रालयावर धडकतील; 2 दिवसांचा अल्टीमेटम देतोय, रोहित पवार आक्रमक
 शहर

MPSC आंदोलनात ओमराजेंच्या भाषणावेळी घोषणाबाजी; ‘ज्याला आपले मानतात, त्याने आपलेपणाही जपला पाहिजे’ म्हणताच टाळ्यांचा कडकडाट

डिजिटल पुणे    05-10-2026 18:29:19

पुणे : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आंदोलनस्थळी दाखल झाले. मात्र, त्यांच्या आगमनानंतर काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ओमराजे भाषणासाठी उभे राहिल्यानंतरही काही आंदोलकांनी पक्षांतराचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, आंदोलनातील विद्यार्थी विवेकानंद पाटील यांनी हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

ओमराजे हे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले असून, त्यांची राजकीय भूमिका काहीही असली तरी आंदोलनाच्या मागण्यांसाठी ते उपस्थित राहिले आहेत, असे विवेकानंद पाटील यांनी स्पष्ट केले. आंदोलनाला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यानंतर ओमराजेंनी माईक हातात घेत परिस्थितीवर भाष्य केले. “अरे, ज्याला आपले मानतात, त्याने आपलेपणाही जपला पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र, यापूर्वी झालेल्या घोषणाबाजीमुळे ओमराजेंना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना आंदोलनस्थळातून बाहेर नेण्यात आले.

‘पेपर फुटला तर विद्यार्थ्यांच्या वेदना मला समजू शकतात’

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना ओमराजे निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. “आंदोलन करणारे विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून आले आहेत. अधिकारी होण्यासाठी ते जीव तोडून अभ्यास करतात. मात्र, पेपर फुटल्यास त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. त्यामुळे त्यांच्या वेदना मला समजू शकतात,” असे ओमराजे म्हणाले.

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या भावना पोहोचवणार असल्याचे आश्वासन ओमराजेंनी दिले.दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी ओमराजेंकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी मांडण्याची मागणी केली.

‘तुमची परीक्षा, आमची निवडणूक; पण तुमच्या वेदना मोठ्या’

“मी लोकप्रतिनिधी आहे. माझ्या मतदारसंघातील अनेकांनी मला पुण्यात आंदोलन सुरू असल्याचे सांगितले. तुमची परीक्षा असते, तशी आमची निवडणूक असते. निवडणुकीत काही घडले तरी पाच वर्षांनी पुन्हा संधी मिळते. मात्र, परीक्षेत घोळ झाला तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते,” असे ओमराजे यांनी सांगितले.

पुण्यात दोन ठिकाणी आंदोलन सुरू असून, दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सर्वसामान्य लोकांशी माझा कनेक्ट आजही आहे. तुमच्या भावना मला समजतात. तुमच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या कानावर घालतो,” असेही ते म्हणाले.

पक्षांतराच्या मुद्द्यावर ओमराजेंचे स्पष्टीकरण

ओमराजे भाषणासाठी उभे राहताच काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या पक्षांतराचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना, “मी तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो आहे. तुमचे विषय मांडतोय, हे चुकलं का?” असा सवाल त्यांनी केला.

आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना ओमराजे म्हणाले, “ओमराजे असाच ओमराजे झाला नाही. खालून धडका घेऊन इथपर्यंत आलोय.” मतदारसंघात आपण २४ तास काम करत असून सर्वसामान्य माणसाची साथ सोडलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे सांगत त्याच पार्श्वभूमीवर आपण पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे ओमराजेंनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती