सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
  • शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
  • मिसिंग लिंकवर पहाटे अपघातांची मालिका; आधी केळीचा पिकअप टेम्पो पलटी, त्यानंतर बस-ट्रकची धडक, ६ ते ७ प्रवासी जखमी
 विश्लेषण

स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी निःशुल्क अन्न सुरक्षा प्रशिक्षण उत्साहात संपन्न ; एकूण ४०० खाद्यपदार्थ विक्रेत्यांना फूड सेफ्टी प्रमाणपत्र वाटप

डिजिटल पुणे    06-10-2026 11:45:45

पुणे : पुणे शहरातील स्ट्रीट फूड विक्रेत्यांनी नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्न उपलब्ध करून द्यावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले निःशुल्क अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम सोमवार दि:३ ते ६  ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. 7 ऑक्टोबर रोजी समारोप होणार आहे.

नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (NASVI) महाराष्ट्र, नेस्ले इंडिया, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI,  फूड अँड ॲडमिनिस्ट्रेशन FDA महाराष्ट्र राज्य , पथ विक्रेता एकता समिति महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या “पत्रकार भवन कॉन्फरन्स हॉल”, नवी पेठ,  पुणे येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आला होता.

या प्रशिक्षणात सहभागी ४०० स्ट्रीट फूड विक्रेत्यांना अन्न हाताळणी, वैयक्तिक स्वच्छता, खाद्यपदार्थांची सुरक्षित साठवणूक, परिसराची स्वच्छता, ग्राहकांना सुरक्षित अन्न देण्याच्या पद्धती तसेच अन्न सुरक्षा कायदे व नियमांचे पालन याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.स्वच्छता व अन्न सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारे ॲप्रन, कॅप, हातमोजे, टॉवेल, ब्रश, मॉप, साबण आदी साहित्याच्या वापराबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.

प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना FSSAI - FoSTaC मान्यताप्राप्त अन्न सुरक्षा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. दिगंबर भोगावडे सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन - पुणे विभाग

FDA, महाराष्ट्र, एन. आर. सरकटे सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन - पुणे FDA, पुणे,जय भद्र मिश्रा प्रादेशिक कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर, नेस्ले इंडिया लिमिटेड, श्री.राजीव ,प्रशिक्षक, नास्वी नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया,दिपक मोहिते,अध्यक्ष पथ विक्रेता एकता समिती महाराष्ट्र राज्य.

 नगर पथ विक्रेता समितीच्या सदस्य व पथ विक्रेता एकता समिती महाराष्ट्र राज्याच्या महासचिव श्रीमती भीमाबाई लाडके,  सागर दहिभाते, गजानन पवार, निलम अय्यर ,मंदार धुमाळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनिल शेवाळे, महासचिव अभय अगरवाल, संघटक सचिव संजय कांची, ऋषिकेश सावंत तसेच पुणे शहर कार्यकारिणी सदस्य अमोल शिंदे, शंकर ठाकूर, कैलास मगर, विनय तिवारी, माधुरी मराठे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने स्ट्रीट फूड विक्रेते उपस्थित होते.

नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (NASVI) च्या वतीने आयोजित या उपक्रमाला FSSAI, FoSTaC, FDA महाराष्ट्र आणि Nestlé यांचे सहकार्य लाभले.“स्वच्छ भोजन – स्वस्थ जीवन” या संदेशातून विक्रेते आणि ग्राहक यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमामुळे स्ट्रीट फूड व्यवसाय अधिक सुरक्षित, स्वच्छ व विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे.७ तारीख उद्या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस आहे .--


 Give Feedback



 जाहिराती