सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी ,प्रियंका गांधीं यांना पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
  • पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी शंभरी पार; आज रात्रीपासून नवा दर लागू
  • पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाला रस्त्याचा अडथळा; खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेची हालचाल
  • चाकणमध्ये अतिक्रमणांचा कहर; पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
  • रोहित पवारांच्या ‘पुणे बंद’च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग; एस. एम. जोशी पुलावर पोलिसांचा मोठा फौजफाटा, पिंजरा गाड्याही तैनात
 जिल्हा

दादर–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एसटी बससेवेचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ

डिजिटल पुणे    07-10-2026 18:51:59

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुंबईशी सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सुरू करण्यात आलेल्या दादर–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवेचा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला. अटलसेतू मार्गे धावणाऱ्या या बससेवेमुळे दादरहून विमानतळापर्यंत प्रवाशांना थेट, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एसटीच्या व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळ्याशी जोडण्याच्या दृष्टीने ही बससेवा महत्वाची आहे. मुंबईतील प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या दादरहून थेट विमानतळापर्यंत सेवा सुरू झाल्याने विमानप्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होईल.” विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी एसटीकडून बोरिवली–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि स्वारगेट–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या बससेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांना विमानतळाशी जोडण्याच्या दृष्टीने या सेवांचा महत्वपूर्ण उपयोग होणार आहे.विमानतळापर्यंत सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाकडून आवश्यकतेनुसार आणखी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती