अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचच्या राज्य अध्यक्षपदी श्री ष ब्र १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची एकमताने निवड
बुधवार दि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचे उपाध्यक्ष - श्री ष ब्र डॉ १०८ श्रीकंठ शिवाचार्य महाराज नागानसुर सोलापुर व महाराष्ट्र वीरशैवलिंगायत शिवाचार्य सभा अध्यक्ष डा विरूपाक्ष शिवाचार्य श्रीक्षेत्र जंगममठ मन्मथधामसंस्थान यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील शिवाचार्यांची बैठक संपन्न करण्यात आली. या बैठकीत वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा महाराष्ट्राच्या सर्वानुमते राज्यमार्गदर्शक म्हणुन शिवाचार्यरत्न ,ष ब्र १०८ श्री डा विरूपाक्ष शिवाचार्य जंगममठ मन्मथधाम संस्थान व ष ब्र १०८ श्री डा शांतवीरलिंगशिवाचार्य हिरेमठ संस्थान औसा यांची निवड करण्यात आले व राज्य अध्यक्षपदी श्री ष ब्र १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष शिवाचार्य रत्न श्री ष ब्र १०८ डॉ शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर तर उपाध्यक्ष: श्री ष ब्र १०८ गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर व सचिव श्री ष ब्र १०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर व तसेच कोषाध्यक्ष श्री ष ब्र १०८ महादेव शिवाचार्य वाईकर महाराज आणि प्रवक्ते म्हणून श्री ष ब्र १०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर व तसेच श्री ष ब्र १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर या सर्व महाराष्ट्रातील शिवाचार्य महाराजांच्या वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा महाराष्ट्र यांच्या नियुक्त्या श्री क्षेत्र मन्मथ स्वामी देवस्थान कपिलधार मांजरसुंबा येथे करून नूतन कार्यकारणी स्थापन करण्यात आली.