सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत राडा सुरूच, राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक, तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त
  • : नाना पाटेकरांवर पुण्यातील डोणजे गावात आजच अंत्यसंस्कार, लाडक्या नटसम्राटाला शासकीय इतमामात निरोप!
  • नाना पाटेकरांचा निधनाच्या ४८ तास आधीचा VIDEO व्हायरल; मुलांसोबत रमले, तबला वाजवला अन् कुणालाही कल्पना नव्हती...
  • ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन; मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा
 विश्लेषण

‘नाना मला ‘सरकार’ म्हणायचे… तुम्ही कायम आमचे ‘नटसम्राट’ राहाल’; नाना पाटेकरांच्या आठवणीने मेधा मांजरेकर भावुक

डिजिटल पुणे    08-10-2026 16:17:40

 पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी नानांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या दमदार अभिनयाने, प्रभावी आवाजाने आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने नाना पाटेकर यांनी रसिकांच्या मनावर वेगळीच छाप उमटवली होती. त्यांच्या जाण्याने अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनीही नाना पाटेकरांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘नटसम्राट’ या चित्रपटात नानांसोबत काम केलेल्या मेधा मांजरेकर यांनी केवळ सहकलाकार म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून नानांच्या आठवणी सांगितल्या आहेत.

मेधा मांजरेकर म्हणतात की, नानांसोबत काम करण्याची संधी मिळणं हे त्यांच्यासाठी भाग्य होतं. नाना अभिनय करताना पाहणं म्हणजे केवळ एका कलाकाराचा अभिनय पाहणं नव्हतं, तर त्यांच्या माध्यमातून कलेसोबतच माणुसकी आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही शिकायला मिळायचा.

‘ते मला सरकार म्हणायचे…’

नानांच्या व्यक्तिमत्त्वातील संवेदनशील बाजू अधोरेखित करताना मेधा मांजरेकर यांनी सांगितलं की, नाना त्यांना प्रेमाने ‘सरकार’ अशी हाक मारायचे. ‘सरकार, कशा आहात?’ असं ते विचारायचे. मात्र, त्यांचा हा प्रश्न केवळ औपचारिक नसून मनापासून काळजीपोटी असायचा, असं मेधा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, मेधा मांजरेकर यांच्या कर्करोगाच्या उपचारांच्या काळातही नाना त्यांची नियमितपणे विचारपूस करायचे. काही दिवसांपूर्वीच नानांचा त्यांना फोन आला होता. त्यावेळीही त्यांनी नेहमीप्रमाणे, ‘सरकार, कशा आहात?’ अशीच आपुलकीने विचारणा केली होती.

‘ते शब्द शेवटचे ठरतील, असं वाटलंच नव्हतं…’नानांसोबत झालेल्या त्या शेवटच्या संवादाची आठवण सांगताना मेधा मांजरेकर भावूक झाल्या. नानांचे ते शब्द शेवटचे ठरतील, याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती, असं त्यांनी म्हटलं आहे.

नाना पाटेकर यांना जग त्यांच्या अभिनयासाठी, दमदार आवाजासाठी आणि विविध भूमिका जिवंत करण्याच्या त्यांच्या विलक्षण क्षमतेसाठी ओळखेल. मात्र, मेधा मांजरेकर यांच्या मनात नाना केवळ ‘नटसम्राट’ म्हणून नव्हे, तर काळजी घेणारा आणि आपुलकीने विचारपूस करणारा माणूस म्हणून कायम राहतील.‘नाना, तुम्ही दिलेल्या असंख्य आठवणी मी आयुष्यभर जपेन. तुम्ही कायम आमचे नटसम्राट राहाल’, अशा भावनिक शब्दांत मेधा मांजरेकर यांनी नाना पाटेकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती