पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘नादब्रह्म - स्वर, ताल आणि भक्तीचा अनोखा संगम’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम शनिवार दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे.या कार्यक्रमात ' रामकृष्ण आध्यात्मिक वारकरी संगीत संस्था, आळंदी'च्या विद्यार्थ्यांकडून मृदंग नाद सादर होणार आहे. अविनाश पाटील हे तबलावादन सादर करतील. तर पं.विश्वनाथ दाशरथे आणि सौ. श्वता कुलकर्णी यांची गायन मैफल होणार असून त्यांना हार्मोनियमवर सुरेश फडतरे साथसंगत करणार आहेत.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाचा हा ३०८ वा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.