सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना धक्का; उमेदवारी अर्ज अवैध, शक्तिप्रदर्शन करत दाखल केला होता अर्ज
  • धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
  • नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
 जिल्हा

दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतल्यास महाविद्यालयांवर कारवाई – मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील

डिजिटल पुणे    13-10-2026 16:21:03

मुंबई : राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी केले आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडून परीक्षा शुल्क आकारण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी दिले

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी शासनाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी.

शासनाच्या निर्देशांचे पालन करून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी. तसेच, शासनाच्या सूचनांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांची दखल घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी अशा सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना दिलासा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे असेही मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती