सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • स्वच्छ मुंबईचा नारा, महापौर रितू तावडे थेट मैदानात; स्वतःच्या पक्षाच्या अनधिकृत फलकांवर कारवाई करत इशारा
  • दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देणार, राज्यातील आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीसांचे कॅबिनेट बैठकीत धडाधड निर्णय
 शहर

नऱ्हे, वडगाव, धायरीच्या पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक; नगरसेवक हरिदास चरवड यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा; नियमित पाणीपुरवठ्यासाठी पुढाकार

गजानन मेनकुदळे    14-10-2026 12:49:44

नऱ्हे : नऱ्हे, वडगाव आणि धायरी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक हरिदास चरवड उपस्थित होते. परिसरातील नागरिकांना नियमित, सुरळीत आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला कार्यकारी अभियंता खुडे, उपअभियंता महेंद्रकर, कनिष्ठ अभियंता साठे, शिंदे, करपे, प्रेम करंजकर तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब नवले उपस्थित होते. यावेळी नऱ्हे, वडगाव आणि धायरी परिसरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणींवर चर्चा करून नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न मार्गी लावण्याबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.

पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, प्रत्येक नागरिकाला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास कमी व्हावा आणि पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असून, नऱ्हे, वडगाव आणि धायरी परिसरातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या बैठकीमुळे परिसरातील पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर तोडगा निघण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती