सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, नेटवर्कमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडवर भर देणार, आकाश अंबानी यांनी जिओचं मिशन मांडलं
  • इम्रान खानच्या अडचणी वाढल्या! 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; सीजेपी आंदोलनात सहभागी झाल्याने कारवाई
  • पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; ऑगस्ट 2027 पर्यंत महापालिकेचे नियोजन
 जिल्हा

डाऊ केमिकल कंपनी मधील स्थानिक कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत अहवाल सादर करावा – उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

डिजिटल पुणे    15-10-2026 18:48:56

मुंबई : तळोजा येथील डाऊ केमिकल कंपनीमध्ये गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ४० स्थानिक भूमिपुत्र कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत कार्यवाही करावी. सकारात्मक दृष्टिकोनातून तसेच, या कामगारांना न्याय देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतचा सविस्तर अहवाल येत्या १५ दिवसांत सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीत संबंधित कामगारांना सेवेत नियमित करण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. बैठकीस संबंधित अधिकारी, डाऊ केमिकल तळोजा कंपनीचे प्रतिनिधी तसेच संबंधित कामगार उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती