सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तोपर्यंत निर्णय संसदेत होतील, हा भारत आहे, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश नाही, देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं...
  • दिल्लीमध्ये ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वीच तणाव; तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतले ताब्यात
  • मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
  • पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सीला ब्रेक! परवानगी मिळेपर्यंत सेवा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
 जिल्हा

मनोरा आमदारनिवाससह नवीन मंत्रालय इमारतीच्या कामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा

डिजिटल पुणे    16-10-2026 13:32:27

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोरा आमदार निवास पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मंत्रालयातील नवीन इमारत तसेच एअर इंडिया इमारतीच्या कामकाजाचाही आढावा घेऊन सर्व कामे दिलेल्या वेळेत व दर्जेदार करण्याचे निर्देश दिले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, सचिव (रस्ते) शरद राजभोज, उपसचिव निरंजन तेलंग, मुंबई इलाख्याच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके, अधिक्षक अभियंता सुषमा गायकवाड, अधिक्षक अभियंता आर.एस. पाटील यांच्यासह विविध अधिकारी तसेच संबंधित बांधकाम करणारे अभियंते उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली व बांधकामाबद्दल समाधान व्यक्त करून ते म्हणाले की, पुनर्विकासाचे काम हे मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असले तरी ते आणखी लवकर करण्यात यावे. तसेच हे बांधकाम करत असताना दर्जामध्ये कोणतेही तडजोड करू नये.

मनोरा आमदार निवास प्रकल्पाचे काम एल अँड टी कंपनी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीने काम करीत आहे. आराखड्यापासून प्रकल्प हस्तांतरणापर्यंतची कामे तसेच हस्तांतरणानंतर सहा महिन्यांचे संक्रमणकालीन संचालन व देखभाल यांचा कंत्राटात समावेश आहे. प्रकल्पात एक तळघर, पार्किंगचे सहा स्तर आणि सातव्या स्तरावर पोडियम असेल. दोन्ही मनोरे १५, २२ आणि २९ व्या मजल्यांवर जोडपुलांनी जोडले जातील. अग्निसुरक्षा निकषांनुसार खालचे दोन जोडपूल बाजूंनी खुले राहतील, तर सर्वोच्च जोडपुलाच्या स्तरावर सुविधा क्षेत्राचे नियोजन केले आहे. सर्व कामे मंजूर आराखडा आणि लागू नियमांनुसारच करण्यावर भर देण्यात आला आहे, असे सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले.

मंत्रालय शेजारी बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या कामाच्या प्रगतीचाही यावेळी भोसले यांनी आढावा घेतला. या इमारतीचे बांधकाम धीम्या गतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे कडक सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच हे काम करताना दर्जा राखण्याचेही निर्देशही दिले. यावेळी मंत्री भोसले यांनी एअर इंडिया इमारतीमधील कामाचाही तसेच इमारतीवर उभारण्यात येणाऱ्या लोगोच्या संदर्भातही माहिती घेतली.


 Give Feedback



 जाहिराती