पुणे : समाजवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन(पुणे )आणि बॅ .नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने' कोकणचा शाश्वत विकास' या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.हे चर्चासत्र रविवार, दि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बॅ नाथ पै सेवांगण मालवण येथे होणार आहे.
'कोकणचा विकास म्हणजे नेमके काय, मोठे प्रकल्प की स्थानिकांच्या हाताला काम' या पार्श्वभूमीवर चार महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. छोटे मच्छीमार आणि मत्स्य संवर्धन, शाश्वत पर्यटन, फळबागा आणि शेतकरी, कोकणाला हवे असलेले उद्योग आणि कृषी उद्योग.या चर्चासत्रात विषय मांडणीसाठी डॉ केतन चौधरी, डॉ सुमेधा नाईक, सुशील कांबळे, सुजय मोरे, व्ही के सावंत, मल्हार इंदुलकर हे मार्गदर्शन करणार आहेत.तर चर्चेत सहभागासाठी प्रा प्रवीण बांदेकर, अभिजित हेगशेट्ये, अॅड देवदत्त परुळेकर, डॉ सतिश लळीत, डॉ संजय मं गो, डॉ ज्योती बुवा तोरस्कर, डॉ राजेंद्र मुंबरकर, अॅड संदीप निंबाळकर, युयुत्सू आर्ते, सुभाष लोमटे, डॉ मनीषा गुप्ते, सुभाष वारे, विनीत विचारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोकणच्या विकासात रस असणाऱ्या सर्व कार्यकर्ते, अभ्यासक, शेतकरी, मच्छीमार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे लक्ष्मीकांत खोब्रेकर आणि उपेंद्र टण्णू यांनी केले आहे.सहभागासाठी संपर्क लक्ष्मीकांत खोब्रेकर 9422946212 आणि उपेंद्र टण्णू 9881701881