सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
  • टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड! सूरत एक्स्प्रेसमधून संशयित ताब्यात, राजस्थानमध्येही पोलिसांची कारवाई
 जिल्हा

‘लोककलेतील श्री गणेश’ कार्यक्रमास उदंड प्रतिसाद ;'bappa.org' मोहिमेचाही नागरिकांना लाभ

डिजिटल पुणे    19-10-2026 11:38:22

ठाणे : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने आणि जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने राम गणेश गडकरी रंगायतन येथे ‘लोककलेतील श्री गणेश’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि पारंपरिक गणेशोत्सवाचा वारसा अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

या विशेष सांस्कृतिक सोहळ्यात २० कलाकारांच्या संचाने पारंपरिक लोककलांचे अप्रतिम सादरीकरण केले. यामध्ये नमन, गण, गोंधळी नृत्य, मंगळागौर, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य आणि जागर-गोंधळ यांसारख्या महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक लोककलांचा समावेश होता.

ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनेते सुशांत शेलार यांच्या ‘शेलारमामा फाउंडेशन’च्या समन्वयातून याचे आयोजन करण्यात आले होते.याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या ‘bappa.org‘ या विशेष मोहिमेबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. पर्यावरणपूरक आणि सुटसुटीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, तसंच गणेशोत्सव मंडळांची नोंदणी, विविध शासकीय परवानग्या आणि गणेशोत्सवाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘bappa.org ही डिजिटल प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांना शासकीय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करणे शक्य झाले आहे.महाराष्ट्राची संस्कृती, आपली ओळख आणि आपला गणेशोत्सव हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवत लोककला आणि प्रशासकीय उपक्रमांचा हा अनोखा संगम ठाणेकरांसाठी एक अभूतपूर्व अनुभव ठरला.


 Give Feedback



 जाहिराती