सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
  • इटलीत Gen-z आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार; आईवडिलांकडून वसूल केली जाणार नुकसान भरपाई, मेलोनी यांचा मोठा निर्णय !
  • जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
  • उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
 शहर

'महाराष्ट्रातील दुष्काळ समस्या आणि पुढील दिशा' या विषयावर राज्यस्तरीय बैठक

डिजिटल पुणे    21-10-2026 11:14:18

पुणे : महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा दीर्घ खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर झाली आहे. खरीप पिकांचे नुकसान पाणी व चाऱ्याची टंचाई शेतमजूरांचा रोजगार स्थलांतर आणि एकल महिला व वंचित कुटुंबावरील वाढता ताण या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय  बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

एस एम जोशी फाउंडेशन आणि मूळचे मराठवाड्यातील असलेले , मात्र सध्या पुण्यात राहणारे रहिवासी यांच्या वतीने ही बैठक आयोजित केली जात आहे. २१ ऑक्टोबर २०२६  रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळात एस.एम. जोशी फाउंडेशन नवी पेठ ,पुणे येथे ही बैठक होणार आहे.साथी सुभाष लोमटे ,ललित बाबर ,सुभाष वारे ,सुजाता भिंगाडे ,राजकुमार धुरगुडे - इत्यादी मान्यवर सहभागी होणार आहेत.

यापूर्वी दि 22 सप्टेंबर 2026 रोजी राज्यस्तरीय ऑनलाइन बैठक झाली होती. त्यात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील 53 कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्या बैठकीतील निर्णयानुसार विभागनिहाय माहितीच्या आधारे दुष्काळ निवारण व तीव्रता कमी करण्याच्या उद्देशाने तसेच शासन प्रशासनासोबत संवादाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही प्रत्यक्ष बैठक होत आहे जिल्हा व विभागनिहाय दुष्काळ स्थिती पाऊस पीक नुकसान पाणी चारा रोजगार स्थलांतर याचा आढावा. तातडीच्या मदतीसाठी उपाययोजना. शासनाकडे मांडावयाच्या मागण्या व कृती आराखडा. सामाजिक संस्था व प्रशासन यांच्यातील कायमस्वरूपी समन्वय. राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेचे नियोजन, हे चर्चेचे प्रमुख मुद्दे  असतील.

या बैठकीस आपापल्या जिल्ह्यातील व परिसरातील प्रत्यक्ष माहिती व अनुभव सोबत घेऊन यावे. दूरध्वनी वरून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उपेंद्र टण्णू मोबाईल 9881701881 यांना कळवावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकरी शेतमजूर वाचला तर महाराष्ट्र वाचेल. एकत्र येऊया दुष्काळावर मात करूया असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

- 


 Give Feedback



 जाहिराती