सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच’; ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंचा संताप, फडणवीसांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी
  • सुशीलकुमार शिंदेंनी भाजपची ऑफर नाकारली, भाजपमध्ये आलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात हे मी बघितलयं
  • नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर रक्तरंजित थरार! लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या; चार वर्षांच्या प्रेमसंबंधांचा दुर्दैवी अंत
 शहर

जीविधा 'आयोजित पर्यावरण व्याख्यानमाला २६ ऑक्टोबर पासून ;'शोधयात्रा - युवा संशोधकांच्या नजरेतून निसर्गाचा अनोखा प्रवास'

डिजिटल पुणे    23-10-2026 16:18:40

पुणे: जीविधा' संस्थेतर्फे पर्यावरण व्याख्यानमाला २६ ऑक्टोबर २०२६ ते ३० ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली  आहे.  ही व्याख्यानमाला 'शोधयात्रा - युवा संशोधकांच्या नजरेतून निसर्गाचा अनोखा प्रवास' या संकल्पनेवर आधारित असणार  आहे.ही व्याख्यानमाला सोमवार दि. २६ ते शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी साडेसहा वाजता इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्र नगर, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर, म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे होणार आहे. व्याख्यानमालेचे हे १६ वे वर्ष आहे.

'जीविधा' चे संस्थापक राजीव पंडित, वृंदा पंडित यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.आपल्या आजूबाजूचा निसर्ग म्हणजे अद्भुत रहस्यांचा खजिना आहे. कीटकांचे गूढ विश्व, दुर्मिळ पक्ष्यांचा शोध, वन्यजीवांच्या हालचाली आणि सह्याद्रीच्या कडेकपारीत फुलणाऱ्या वनस्पती अशा निसर्गाच्या विविध पैलूंवर युवा संशोधक आपले अनुभव मांडणार आहेत.

व्याख्यानमालेची सुरुवात सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी ईशान पहाडे यांच्या 'कीटक व आपण' या विषयाने होईल. मंगळवार दि. २७ ऑक्टोबर रोजी मिहीर जोशी 'विंचू आणि विज्ञान' या विषयावर बोलतील. बुधवार दि. २८ ऑक्टोबर रोजी हृषिकेश करंदीकर हे 'वन्यजीव संशोधन: काल, आज आणि उद्या' हा विषय मांडतील. गुरुवार दि. २९ ऑक्टोबर रोजी अर्णव गंधे 'संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यजीवांचे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून संवर्धन' यावर संवाद साधतील. शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर रोजी आनंदी कोरडे या 'वनस्पती सह्याद्रीच्या कडेकपारीतल्या' या विषयावर मार्गदर्शन करतील.ही व्याख्यानमाला निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.


 Give Feedback



 जाहिराती