सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
  • आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
  • 'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
  • दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा,
  • उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
 DIGITAL PUNE NEWS

‘कामाच्या मागे धावताना आयुष्यातील मौल्यवान नाती हरवली’; आमिर खानला भर मंचावर अश्रू अनावर, मनातील खंत केली व्यक्त

डिजिटल पुणे    24-10-2026 12:10:34

मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आमिर खान याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या भावनिक वक्तव्यामुळे लक्ष वेधून घेतले आहे. सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील एका कार्यक्रमात बोलताना आमिरला भावना अनावर झाल्या. गेल्या तीन दशकांपासून कामात पूर्णपणे गुंतून राहिल्यामुळे कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींना पुरेसा वेळ देता आला नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली.

आमिर खान हा आपल्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी घेतल्या जाणाऱ्या मेहनतीमुळे ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. मात्र, याच कामाच्या ध्यासात आयुष्यातील महत्त्वाची वर्षे निघून गेल्याची जाणीव त्याला आता झाली आहे. कोविड-19 महामारीच्या काळात मिळालेल्या निवांत वेळेत त्याने स्वतःच्या आयुष्याचा विचार केला आणि अनेक गोष्टींची नव्याने जाणीव झाल्याचे सांगितले.

‘तीन दशकं कामातच गेली, नात्यांकडे दुर्लक्ष झालं’

कार्यक्रमात आपल्या अनुभवांबद्दल बोलताना आमिरने सांगितले की, एखाद्या कामासाठी एक-दोन किंवा पाच वर्षे पूर्णपणे झोकून देणे समजू शकते. मात्र, हाच दिनक्रम जवळपास 30 वर्षे सुरू राहिला, तर आयुष्यातील इतर महत्त्वाच्या गोष्टी मागे पडतात. कामाच्या धावपळीत मुलं मोठी होतात, आयुष्य पुढे सरकतं आणि अनेक नात्यांना हवा तसा वेळ देता येत नाही.

ही जाणीव व्यक्त करताना आमिर भावूक झाला. आपल्या आयुष्यातील मौल्यवान क्षण गमावल्याची खंत त्याच्या बोलण्यातून जाणवत होती. त्याच्या डोळ्यांत अश्रू आल्याने कार्यक्रमातील वातावरणही भावनिक झाले. 'व्हरायटी'च्या वृत्तानुसार, त्याला भावूक झालेलं पाहून प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने त्याच्यासाठी टिश्यू पेपरचा बॉक्स आणला.

‘ही जाणीव वयाच्या 56 व्या वर्षी झाली, हे समाधान’

या अनुभवातून मिळालेल्या शिकवणीबद्दल बोलताना आमिरने एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली. आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलण्याची जाणीव आपल्याला वयाच्या 86 व्या वर्षी होण्याऐवजी 56 व्या वर्षी झाली, याचा त्याला आनंद आहे. कारण इतक्या उशिरा ही जाणीव झाली असती, तर आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी वेळ कमी पडला असता, असे त्याने नमूद केले.

आमिरच्या या वक्तव्याने यश, प्रसिद्धी आणि करिअर यांसोबतच कुटुंब, मुलं आणि वैयक्तिक नात्यांनाही वेळ देणं किती महत्त्वाचं आहे, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मोठं यश मिळवण्याच्या धडपडीत अनेकदा आयुष्यातील साधे, पण अनमोल क्षण मागे राहतात. आमिरने व्यक्त केलेली ही खंत त्याच वास्तवाची जाणीव करून देणारी आहे.


 Give Feedback



 जाहिराती